Ticker

6/recent/ticker-posts

कृषी मालाचे वैज्ञानिक पॅकेजिंग बद्दल गट चर्चा



बुध  दि .[ प्रकाश राजेघाटगे ] 

खटाव तालुक्यातील राजापूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी "ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2024-25" कार्यक्रमांतर्गत केली कृषी मालाचे वैज्ञानिक पॅकेजिंग बद्दल गट चर्चा . कृषिदुतांनी भाजीपाला, फळे व पिकांमध्ये  वापरले जाणारे विविध पॅकेजिंग मटेरियल ची माहिती दिली तसेच 

एडीबल फिल्म पॅकेजिंग, मोडिफिएड हुमिड पॅकेजिंग , कंट्रोलड अटमोस्फरिक व मोडीफाइड अटमोस्फरिक पॅकेजिंग चे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी किरण राऊत, गजानन घनवट, बाबू घनवट विष्णू राऊत, शैलेश बरबोले, मनीषा गोरे, रुपाली घनवट , अर्पिता घनवट, सुनंदा घनवट , संगीता घनवट , गौरव घनवट , अमोल झगडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते. 

कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी.चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित ,  प्रा. संजय अडत सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत अथर्व देवकर , यश निकम , रोहन बरबोले ,पुष्कर बिसेन , सत्यजित धायगुडे , सुयोग भोसले , व साहिल भोसले यांनी हा उपक्रम पार पडला.