बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
कृषी महाविद्याल फलटण - खटाव तालुक्यातील राजापुर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदुतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक शेतमालाच्या विक्रीचे अॉप्लिकेशन्स यांच्या माहिती संबंधी प्रात्यक्षिक हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडला.
कृषिदुत अथर्व देवकर, यश निकम, रोहन बारबोले, पुष्कर बिसेन, सत्यजित धायगुडे, सुयोग भोसले, व साहिल भोसले यांनी मोबाईल मधील शेतीविषयक विविध अॅप्लिकेशन्स जसे की इफ्फको किसान, मार्केट यार्ड, कृषिक, भारत अॅग्री, आवक बाजारभाव माहिती इत्यादींची ओळख शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे करून दिली.
या अॅप्लिकेशन्सद्वारे होणारे फायदे जसे की चालू बाजारभाव, हवामान अंदाज, पूरक बियाणे, कीटकनाशके व खते यांच्या चालू बाजारभावाची माहिती इत्यादी शेतकऱ्यांना पटवून दिली. तसेच प्रगतशील शेती व हे अॅप्लिकेशन शेतकऱ्याला शेतीचे अर्थनियोजन योग्य पद्धतीने करण्यासाठी कसे मदत करतात, याविषयी माहिती दिली. कृषीदुतांनी हे अॅप्लिकेशन्स मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यापासून ते त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करावा याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यू.डी.चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर व प्रा. नितीशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.





Social Plugin