बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सेवानिवृत्तांनी आपल्या अनुभवाचा फायदा समाजास द्यावा . त्यांनी छंद जोपासावेत . समाजकार्य करावे .आरोग्य जपावे . शिक्षण क्षेत्र पवित्र क्षेत्र असून शिक्षक म्हणून प्रामाणिक काम करताना आत्मीक समाधान मिळते तसेच सेवानिवृत्तांचे योगदान संस्था कायम स्मरणात ठेवेल . असे विचार श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ . श्री सुरेशराव जाधव यांनी व्यक्त केले . ते संस्थेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते .ज्येष्ठ संचालक डॉ . सुभाष आगाशे, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनी आपल्या मनोगतात आहार , विहार व व्यायामाचे महत्व व्यक्त करून शुभेच्छा दिल्या .
श्री एस .आर. पाटील सर यांनी प्रास्ताविक केले यावेळी माजी प्राचार्य श्री सुधाकर माने, प्राध्यापक श्री बबन लोंढे ,नाईक श्री चंद्रकांत घनवट यांचा संस्थेच्या वतीने सपत्नीक सत्कार करून त्यांना निवृत्तीच्या सेवापूर्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मा .प्राचार्य श्री सुधाकर माने यांनी आपल्या मनोगतात संस्थेने सेवेची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले . प्रा. शंकर चव्हाण ,सौ शोभाराणी लाड , सौ भारती माने, सौ अहिल्या माने यांनी मनोगते व्यक्त केली . कार्यक्रमास संस्था सचिव श्री मोहनराव जाधव, खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव, विश्वस्त श्री विश्वनाथराव जाधव , श्री विष्णूपंत खटावकर,गुणवत्ता वाढ प्रकल्पाचे श्री के.डी .पवार ,श्री डी .पी. शिंदे ,श्री जयंतराव जाधव , श्री धनराज माने,विविध शाखांचे मुख्याध्यापक , पर्यवेक्षक,पालक ,शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सौ आरती माळी व सौ अमृता जाधव यांनी सूत्रसंचालन केले . विश्वस्त श्री योगेशराव देशमूख यांनी आभार मानले .





Social Plugin