प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव
चाळीसगाव येथील बी.पी. आर्टस, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.व्ही. काटे, उपप्राचार्य डी. एल. वसईकर, उपप्राचार्या डॉ. के. एस. खापर्डे, उपप्राचार्य ए. आर. मगर, हिम्मत आंदोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे होते. त्यांनी मनोगतात वसंतराव नाईक यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. यावेळी प्रा. एम. ओ. अहिरे, डॉ. पी.एस. नन्नवरे, प्रा. पंकज वाघमारे, रघुनाथ खलाल, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी हेमंत गायकवाड, संजय जाधव यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक उत्सव समितीचे प्रमुख अंकुश जाधव तर प्रा. किशोर पाटील यांनी आभार मानले.





Social Plugin