Ticker

6/recent/ticker-posts

नदी घाटावर महिलांना शौचालय व रूम बांधण्याची नितांत गरज.



. प्रतिनिधी /खेड: 

ज्ञानियांचा राजा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी स्थळाने पवित्र असणारे श्री क्षेत्र आळंदी देवाची; ता खेड जि. पुणे येथील इंद्रायणी नदी घाटावर महाराष्ट्र राज्यातून माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला ;वृध्द महिला ;युवती ;वारकरी महिलांसाठी शौचालय व स्नान झाल्यानंतर कपडे बदलण्यासाठी (चेंजींग रूम ) बांधण्याची नितांत गरज असून आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री कैलास केंद्रे साहेब यांनी इंद्रायणी घाटाची पाहणी करून इंद्रायणी नदी घाटावर एखाद्या संस्थेकडून शौचालयाचे बांधकाम करून घ्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी रविवार; गुरुवार ;एकादशी ; सन व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी महाराष्ट्र राज्य परिसरातून महिला ;युवती ;ज्येष्ठ महिला आळंदीत येतात. सर्वप्रथम पवित्र इंद्रायणी नदी घाटावर नतमस्तक होऊन स्नान करून व हात पाय धुवून माऊलींच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. परंतु इंद्रायणी नदी घाटावर महिलांना शौचालय व कपडे बदलण्या साठी ( चेंजिग रूम) नसल्यामुळे महिलांचे अतोनात हाल होत आहेत. व तसेच प्रदक्षिणा रस्त्या वरील पाण्याच्या टाकी खाली असणारे महिलांचे शौचालय अनेक महिन्यांपासून बंद आहे. भागीरथी नाल्यावरील दोन्ही बाजूला  शौचालय बंद आहेत शौचालय शेजारून जाताना उग्र वास येत असल्यामुळे ग्रामस्थ ;रहिवाशी ;वाहन चालक ;वारकरी यांना दुर्गंधीचा वास सहन करावा लागत आहे. या घाणी मुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

आळंदी चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्री कैलास केंद्रे साहेब यांनी आळंदी नगर परिषद इमारत; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरण व गार्डन.व चाकण चौक येथे तुळशी वृंदावन बांधल्यामुळे श्री क्षेत्र आळंदी च्या वैभवात वाढ झाली आहे. केंद्रे साहेबांनी एखाद्या संस्थेस इंद्रायणी घाटावर महिलांसाठी शौचालय बांधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी वारकरी महिलांनी केली आहे.