प्रतिनिधी-शौकत शेख
शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर विविध मागण्यासाठी दिव्यांगांनी सुरू केलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे तालुकाप्रमुख जावेद शेख यांनी दिली
शेवगाव तालुक्यातील अपंग दिव्यांगांना रेशन वरील स्वस्त धान्य मिळावे वंचित असलेल्या दिव्यांगांना पिवळे रेशन कार्ड मिळावा अदी मागण्यासाठी जय शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष नवनाथ राव इसारवाडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली सध्या लाडकी बहीण व लाडका भाऊ या योजनेसह इतरही काही योजनांच्या कामाचा भार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने हे गर्दी कमी होतात तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन दिल्याने तुर्त धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती शेख यांनी दिले आंदोलनात जय शिवसंग्राम तालुकाप्रमुख संदीप बामदले. दिलीप भागवत संघटनेचे युवक अध्यक्ष विकास गटकळ शहर अध्यक्ष अशोक कुसळकर तालुका उपाध्यक्ष शब्बीर शेख रसूल अमिन शेख यांच्यासह पदाधिकारी सामील झाले होते





Social Plugin