Ticker

6/recent/ticker-posts

स्नेहभोजनाने शिक्षण सप्ताहाचा समारोप



  सुपतगाव/ प्रतिनिधी - उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण विभागाच्या आदेशा नुसार  शिक्षण सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार यावेळी वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून शिक्षक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग करून अध्ययन अध्यापनाला सुरुवात केली सांख्यिकी भाषा ओळखणे, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस या अंतर्गत भाषिक खेळ गणितीय खेळ गणित तज्ञाच्या गोष्टीचे आयोजन भौमितिक आकृत्यांच्या रांगोळी व पोस्टर निर्मिती तयार करण्यात आली.तसेच विविध खेळांचे आयोजनसुद्धा करण्यात आले होते. विदयार्थ्याच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतीक कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले यावेळी लोकगीते, कोळीनृत्य, दांडीया नृत्य, भावगीत, घेण्यात आले.

  तसेच सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी रविवारी सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन मुख्याध्यापक जी. एम. कबाडे, शिक्षक,व्ही.जी.बनसोडे, एम एस सोळशे, जे.एस. दलाल,राजेंद्र सूर्यवंशी, नागनाथ बनसोडे,शालेय समितीचे सर्व पदाधिकारी,ज्ञानेश्वर गुरव, राजेंद्र लामजणे, संतोष विभुते, सुधाकर हेंडले, राजेंद्र करके यांच्यासह गावातील ग्रामस्थ-पालक उपस्थित होते.