आ.राजेश एकडे यांनी चार महिन्या अगोदर रस्त्याचे केले होते भूमिपूजन
प्रतिनिधी रवींद्र गव्हाळे
मलकापूर :- मलकापूर तालुक्यातील प्रति शेगाव म्हणजेच घिर्णी गावातील बरेचसे नागरिक शेतीचे काम करण्यास सोपे व्हावे यासाठी आपल्या शेतामध्येच राहतात आणि तिथूनच आपला उदरनिर्वाह करता आणि आपल्या मुलांना शिकवतात परंतु अनेक वर्षांपासून त्यांना अत्यावश्यक सेवेसाठी गावांमध्ये यावे लागते. दगड गोट्यांचा खडतर प्रवास करून नागरिक गावामध्ये पोहोचतात परंतु पावसाळ्यामध्ये ही स्थिती खूप बिकट होते. शाळांमध्ये आपल्या लहान लहान लेकरांना घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागते .
काही महिने अगोदर गावातील काही ठराविक शेतकरी व नागरिकांनी तालुक्याचे आमदार राजेश एकडे यांच्या कानावर ही बातमी टाकली व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता निधी उपलब्ध करून दिला परंतु गावातील पुढार्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठा आक्रोश आहे. याकडे गावातील ग्रामपंचायतचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे अशी गावामध्ये चर्चा सुरू आहे, व स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोकांनी काम थांबून ठेवण्याची चर्चा सुद्धा गावात आहे.





Social Plugin