Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार सत्कार महामुने यांना उत्कृष्ट युवा पत्रकार 2024 हा पुरस्कार


किनवट शेख अमिरपाशा 

 युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश भाऊ कचकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार सोहळा 2024 हिवरा संगम येथे पार पाडला. या सोहळ्यामध्ये विविध भागातील पत्रकारांची उपस्थिती होती. विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक व राजकीय काम करत असलेल्यांना अतिशय चांगली कामगिरी पाहून त्यांना सन्मानचिन्ह देऊन पुरस्कारित करण्यात आले. याच पुरस्कार सोहळ्यामध्ये माहूर तालुक्यातील छोट्याशा खेड्यामध्ये राहणारे युवा पत्रकार सत्कार गौतम महामुने रा.पाचुंदा यांना उत्कृष्ट युवा पत्रकार 2024 हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 

पत्रकारिता क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कार महामुने यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश भाऊ कचकलवार यांचे उत्कृष्ट युवा पत्रकार 2024 हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे आभार मानले. युवा ग्रामीण पत्रकार संघटना ही अशी एकमेव संघटना आहे कुठलाही भेद न करता सर्वांना सोबत घेऊन चालणारी अडी अडचणीत वेळोवेळी मदत करणारी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ग्रामीण भागातून ते शहरी भागातील सर्व पत्रकारांना सोबत घेऊन चालणारे पत्रकारांना काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण करणारी संघटना बनली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीकार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन उमरखेड महागांव विधानसभा मतदार संघाचे मा. आमदार राजेंद्र नजरधने प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत साईनाथ महाराज , शाम महाराज भारती, पंचायत समितीचे माजी सभापती गजानन कांबळे, युवा ग्रामिण पञकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार व विविध भागातून आलेले पत्रकार मंडळी उपस्थित होते