Ticker

6/recent/ticker-posts

शेतात काम करत असताना वीज पडून 56 वर्षीय महिलेचा मृत्यू; तर एक महिला गंभीर जखमी मलकापूर तालुक्यातील म्हैसवाडी येथील घटना



मलकापूर: मलकापूर तालुक्यातील म्हैसवाडी येथील 56 वर्षीय महिलेचा शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. तर एक महिला गंभीर जखमी झाली..!सविस्तर माहिती अशी की म्हैसवाडी येथील रहिवासी पुष्पा प्रभाकर राणे वय 56 यांचा मृत्यू झाला तर योगिता विनोद किंनगे वय 45 ही महिला गंभीर जखमी तर एक बैल दगावलादोन-तीन दिवसापासून पाऊस बंद असल्यामुळे उन्हाच्या तीव्र ते मुळे दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या दरम्यान अचानक पाऊस सुरू झाला त्यादरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन विजेचा कडकडात सुरु झाला म्हैसवाडी येथील दोघी महिला शेतात काम करत होते त्यातील एक महिला मृत्यू पावले तर एक गंभीर रित्या जखमी  झाल्या आहे.विजेचा हा तांडव शेजारील शेतात काम करत असणारा चेतन पाटील त्याच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ गावातील पोलीस पाटील योगेश पाटील यांना भ्रमणध्वनी वरून घटनेची माहिती सांगितली.योगेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.घेत तहसीलदार राहुल तायडे, मंडळ अधिकारी वानखेडे, तलाठी कौशल महाजन व दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमराज कोळी यांना भ्रमणध्वनी वरून सदर घटनेची माहिती दिली.

योगा योगाने याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते शुभम लाहुळकर हे नजीकच्या रस्त्याने जात होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी योगिता किनगे यांना स्वतःच्या चार चाकी वाहनाने मलकापूर आणत तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. त्यामुळे गंभीर जखमी योगिता किणगे यांच्यावर लवकर उपचार करणे शक्य झाले. दुसरीकडे मलकापूर नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट हरीश रावळ यांनी घटनेची माहिती मिळताच मलकापूरहून रुग्णवाहिका पाठवीली. त्या वाहनातून पुष्पा राणे यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

दरम्यान म्हैस वाडी प्रमाणेच दसरखेड औद्योगिक वसाहत परिसरातील विवरा येथे पाऊस आणि विजेने आज शुक्रवारी थैमान घातले.यामुळे नीलिमा प्रकाश चोपडे यांच्या शेतात असलेल्या बैलावर वीज कोसळून तो जागीच दगावला. विवरा येथील पोलीस पाटील यांनी दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.