बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीदूतांनी या कार्यक्रमांतर्गत ललगुण येथे विठ्ठल मंदिरात रांगोळीच्या स्वरूपात विविध प्रकारचे नकाशे व माहितीचे तक्ते रेखाटले होते.
यामधे गावच्या सर्व सार्वत्रिक नकाशे, जलकुंभ, व सरकारी कार्यालयांचे स्थापन साल, साक्षरता तक्ता, वार्षिक पिक तक्ता, उत्पादन तक्ता, मातीचा प्रमाण तक्ता, सामाजिक नकाशा, रस्त्याचा नकाशा, रहदारीचा नकाशा इत्यादींचा समावेश करण्यात आला होता. कृषिदुतांनी या नकाशाद्वारे गावकऱ्यांना सहभागी करून कार्यक्रम पार पाडला.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम प्रा. अडसूळ सर आणि प्रा. नीलिमा धालपे मॅडम (EXTENTION DEPARTMENT) यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, सुमित बागुल, ओंकार खेडकर, गौरव रायकर, अमितेश बोदडे, आदित्य घेवारे यांनी हा कार्यक्रम पार पाडला.





Social Plugin