बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीदूतांनी नर्सरी व्यवस्थापनावर चर्चासत्र आयोजित केले होते.
या चर्चासत्रादरम्यान नर्सरी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शक म्हणून प्रदीप तुकाराम केंजळे हे उपस्थित होते. तसेच गावातील विविध शेतकऱ्यांनी ही मोठ्या प्रमाणात या चर्चासत्रात उपस्थिती दर्शवली. प्रदीप केंजळे यांनी नर्सरी मध्ये विविध प्रकारच्या घटकांचे योग्य व्यवस्थापन करून नाना प्रकारची रोपे तयार करून कश्या प्रकारे विक्री करता येईल याची माहिती दिली. या चर्चासत्रास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम व प्रा. संजय अडत सर ( HORT DEPARTMENT ) यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, सुमित बागुल, ओंकार खेडकर, गौरव रायकर, अमितेश बोदडे, आदित्य घेवारे यांनी हे चर्चासत्र पार पाडले.





Social Plugin