Ticker

6/recent/ticker-posts

काथवडपाडा येथील शेतकऱ्यांचे नवजीवन विस्कळीत.


नाल्यावर लोखंडी पूल बांधण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी 

तालुका प्रतिनिधी: शंकर निंबारे

त्र्यंबकेश्वर तालुक्यात दोन तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गुजरात-महाराष्ट्र सिमावर्ती भागातील नदी नाल्यांना पुर आला आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने नवजीवन विस्कळीत झाले असून काथवडपाडा येथील शेतकऱ्यांनी जीव मुठीत धरून ग्रामस्थांच्या मदतीने कसेबसे नाला पार करुन शेतावरुन घरी पोहोचले.

    पावसामुळे निसर्गाला नवचैतन्य मिळाले आहे. जोरदार धोधो पडणाऱ्या पावसाने चहुबाजूंनी पाणी च पाणी झाले असून नदी नाले ओहोळांना पुर आला आहे. महाराष्ट्र कडून गजरात कडे वाहणारी दमणगंगा तसेच लहान मोठे नदी नाले ओहोळांचे पाणी पातळीत वाढ झाली आहे.

   देवडोंगरा येथील काहंडोळीचे पाझर तलावातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने गायपातळीचा नाला दुथडी भरून वाहत असल्याने काथवडपाडा येथील शेतकऱ्यांचे नवजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी महिलांसह जनावरांचाजीव मुठीत धरून ग्रामस्थांच्या मदतीने नाला पार केला. दरवर्षी काथवडपाडा येथील शेतकऱ्यांना या पुर परिस्थितीला सामोरे जावे लागते. याची लोकप्रतिनिधींनी तसेच शासनाने त्वरित दखल घेऊन काथवडपाडा येथील गायपातळीच्या नाल्यावर लोखंडी पूल बांधण्यात यावा. अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या पुलाचा काथवडपाड्यातील शेतकऱ्यांना तसेच देवडोंगरी, सादडपाडा, गौळपाडा, बोरमाळ, बाफणविहीर, माणिपाडा, गोलदरी येथील पादचारी प्रवाशांना फायदा होईल असे धन्वंतरी सेवाभावी ट्रस्ट चे अध्यक्ष हिरामण घुलुम यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात दि.04/08/2024 रोजी   झालेल्या एकूण  मंडळ निहाय पावसाची माहिती खालील प्रमाणे आहे. 

1)त्र्यंबकेश्वर - 98.00 मिमी 2)वेळुंजे      - 130.00 मिमी 3)हरसूल     - 92.08 मिमी   एकूण      - 320.08 मिमी