Ticker

6/recent/ticker-posts

प्रेमचंदाने हिंदी कथासाहित्याला नवीन दिशा दिली- प्रा.डी.एम.बहिरम



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 प्रेमचंदांनी ज्यावेळी साहित्य क्षेत्रात प्रवेश केला त्यावेळी हिंदी व उर्दू साहित्यातही अद्भुत रहस्यमय कथा साहित्य निर्माण होत होते. अशा काळात हिंदी कथा साहित्याला एक नवीन दिशा दिली असे प्रतिपादन प्रा.डी.एम बहिरम यांनी केले. कला व वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव येथे अग्रणी महाविद्यालय व हिंदी विभाग आयोजित मुंशी प्रेमचंद यांच्या १४४ व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर  महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. पी. भोसले,  प्रा.डाॅ. संजय क्षीरसागर, प्रा.डॉ.संग्राम शिंदे,प्रा. डॉ.के.एम.निंबाळकर ,प्रा.डी.पी. कर्डेल इ.उपस्थित होते. पुढे आपल्या भाषणात प्रा. बहिरम म्हणाले,' प्रेमचंदांनी हिंदी भाषेमध्ये वास्तववादी, कलात्मक कथा वाड् .मयाची मुहूर्तमेढ रोवली . साहित्यातील कथानका मधून मध्यमवर्गाच्या मानसिक आणि सामाजिक स्थितीचे मोठे प्रभावी चित्रण केले आहे. प्रेमचंद्राची 'गबन' कादंबरी ही मध्यमवर्गीय माणसाच्या स्वभावाचे उत्कृष्ट चित्रण करणारी कादंबरी आहे. आपल्या कथा मधून ग्रामीण व नागर अशा दोन्ही प्रकारच्या जीवनाचे चित्रण केले आहे. सुधारणावाद, समाजवाद इत्यादी विचारसरणीचा प्रभाव पडलेला आहे. त्यांच्या वाङ्मयात कुटुंब व्यवस्थेला फार महत्त्व आहे. असे सांगितले . 

या कार्यक्रम प्रसंगी डॉ.संजय क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी साहित्यकृतीचे वाचन केले पाहिजे तसेच स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी. भोसले म्हणाले,'प्रेमचंद आणि भारतातील विविध जातीच्या धर्माच्या वर्गाच्या जीवनाचे चित्रण आपल्या साहित्यकृतीतून केले. कारण साहित्यामध्ये समाज मनाचे प्रतिबिंब असते'. याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डॉ.के.एम. निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डी.पी.कर्डेल यांनी केले. आभार प्रा.एल.के. पवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.           छायाचित्र - पुसेगाव -कला व वाणिज्य महाविद्यालयात मुंशी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना प्रा.डी.एम.बहिरम,सोबत व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ राजेंद्र भोसले,प्रा.डाॅ.संजय क्षीरसागर, प्रा. ‌डॉ.संग्राम शिंदे प्रा.डाॅ.के.एम.निंबाळकर