Ticker

6/recent/ticker-posts

त्र्यंबकेश्वर येथे ‘चला खेळुया मंगळागौर’ व गुलाबी साडी डान्स स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन.



तालुका प्रतिनिधी: शंकर निंबारे, देवडोंगरी

त्र्यंबकेश्वर | दिनांक.२२ रोजी खास महिलांसाठी कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील महिलांसाठी ‘चला खेळुया मंगळागौर ‘ व गुलाबी साडी डान्स स्पर्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मंगळागौर पूजन हळूहळू कालबाह्य होत चाललंय. तरीदेखील काही संस्थांनी मंगळागौर साजरी करण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे  मंगळागौरीच्या खेळातून महिलांच्या मनाला आनंद तर मिळतच असतो मात्र शरीराला व्यायामही होतो. 

आता महिला नोकरी करणाऱ्या असल्यामुळे मंगळागौर जागविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु हा पारंपरिक खेळ टिकला पाहिजे यासाठी कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एडवोकेट अंजली पाटील उपाध्यक्ष डॉक्टर ज्योति सोनवणे सेक्रेटरी निमा विसपुते  तसेच नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पुरोहित आदी उपस्थित होते.


   मंगळागौर कार्यक्रमात नखुल्याबाई नखुल्या, चंदनाच्या टिकुल्या, एक टिकली उडाली, गंगेत जाऊन बुडाली, "किस बाई किस दोडका किस, दोडक्‍याची फोड लागते गोड',झिम पोरी झिम अशी अनेक गाण्यांवर महिलांनी खेळ खेळून मंगळागौर साजरा केला. यावेळी सहभागी झालेल्या महिलांना लकी आकर्षक बक्षीस देखील देण्यात आली. यासोबतच श्रावण निमित्त खास उपवासाच्या पदार्थांची पाककला स्पर्धा देखील या प्रसंगी आयोजित करण्यात आली होती यावेळी अल्पबचत प्रतिनिधी संस्थेचे सर्व सभासद तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.