बंडु शिंगटे घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील महावितरण कंपनीचे कर्मचारी लाईनमन पांडुरंग रणमाळे यांची घुंगर्डे हादगाव येथुन अंबड येथे बदली झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने लाईनमन पांडुरंग रणमाळे यांचा सत्कार करण्यात आला.
लाईनमन पांडुरंग रणमाळे यांनी चार वर्षे घुंगरडे हदगाव येथील ग्रामस्थांना महावितरण ची एक चांगल्या प्रकारे सेवा दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने हा सत्कार ठेवण्यात आला होता यावेळी गावचे उपसरपंच कृष्णा सिंग पवार, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष माऊली मस्के, बप्पासाहेब मस्के, तलाठी लव्हाळे साहेब, लाईनमन वादेसाहेब, प्रदीप जोशी, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खापरे, नवनाथ भद्रे, किशोर पवार बंडू शिंगटे, शिवाजी शेळके, अमोल खापरे, बिरले, गोरख पवार , पपु काळे सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.





Social Plugin