पाटण (दिनकर वाईकर)
कराड ते चिपळूण महामार्गावरील संगमनगर ते पाटण रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात पंचायत समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्ते बबनराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता संगमनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी दि 4 सप्टेंबर गणपती आगमनापुर्वीची मुदत दिली असुन या मुदतीत रस्त्याचे खड्डे मुजवुन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली नाही तर महामार्गाला जेसीबी लावून तो उखरण्यात येईल, असा इशारा बबनराव कांबळे व राजाभाऊ शेलार यांनी बोलताना अधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी बाळासाहेब कदम, पंकज गुरव,सत्यजित शेलार, संपत जाधव आदींनी उपस्थित राहुन रस्त्याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.
यावेळी बबनराव कांबळे म्हणाले, आंदोलनाची घोषणा केली की खड्डे भरण्याची लगभग सुरू होते महामार्ग विभाग व ठेकेदाराला यापुर्वीच रस्ताची व जनतेची जबाबदारी घेतली असती तर आम्हावर आंदोलनाची वेळ आली नसती.यापुढे महामार्ग खड्डे मुक्त झाला नाहीतरी पुन्हा मोठे आंदोलन उभारले जाईल
राजाभाऊ शेलार म्हणाले यापुर्वी अनेक आंदोलन बैठका झाल्या मात्र रस्त्याची स्थिती बदलत नाही याचा अर्थ कोयना भागातील लोकांना जाणुनबुजुन अन्याय केला जात आज प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार आंदोलन मागे घेतले असले तरी यापुढे आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी माघार घेणार नाही. आंदोलनस्थळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सहाय्यक अभियंता पुजा परदेशी कनिष्ठ अभियंता मणेर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप शितोळे मंडलाधिकारी संजय जंगम तलाठी शशिकांत बोबडे व निलेश भाग्यवंत आदी उपस्थित होते.
कोयना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप शितोळे यांनी मोठ्या संख्येने पोलीस बदोबस्त तैनात केला होता अर्धा तास चाललेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी आदोलनस्थळी महामार्ग विभागाचे सहाय्यक अभियंता पुजा परदेशी यानी संगमनगर ते पाटण या १३ किमी रस्ताचा खड्डे भरण्याचे काम सातत्याने सुरू असुन पावसामुळे डांबराने खड्डे भरता आले नाहीत तसेच नविन रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार आवश्यक मशिनरी पंधरा दिवसात आणणार असुन महिनाभरात शासकीय प्रकिया पुर्ण झाली की प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. असे आश्वासन दिले.पावसामुळे डांबराने खड्डे भरता आले नाहीत यावर आक्षेप घेत बाळासाहेब कदम म्हणाले गेली सात आठ वर्षे रस्तादुरावस्था झाली आहे त्याविरोधात आंदोलन सुरू आहेत दरवर्षी या भागात पावसाचे अधिक प्रमाण असतो हे महामार्ग विभागाला ठाऊक नाही का?
या आदोलनात कोयना भागातील पदाधिकारी,कार्यकर्ते आणि कोयना भागातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते





Social Plugin