Ticker

6/recent/ticker-posts

घरातून मोबाईल चोरणाऱ्या मुंबईच्या चोरट्यास अटक


प्रतिनिधी दीपक गुरव@      चाळीसगाव

चाळीसगाव घरात प्रवेश करून सुमारे १८ हजार ६०० रूपये किमतीचे दोन मोबाईल बोरी प्रकरणी बाळीसगाव शहर पोलीसांनी मुंबईच्या भामट्यास अटक केली.

येथील बसंती मिल, स्टेशन रोड, सिंधी कॉलनीतील शंकर अंबुलाल वाधवा यांच्या घरात पुसून अज्ञात चोरट्याने १८ हजार ६०० रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी वाधवा यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टे हनला कलम ३०५.३३१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या मोबाईल चोरीया तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय विश्वास पाटील, हवालदार अजय पाटील, पोना, दीपक पाटील, अमोल भोसले, गणेश कुवर, अमोल पाटील यांनी केला. अजय पाटील व अनोल भोसले यांना एक इसम दोन मोबाईल हातात घेऊन रेल्वे नाल धक्काजवळ संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली असता पोलीसांनी त्यास पकडून त्याची चौकशी केली असता तुफेल रजा नेमन (२३) रा. गफ्फार चाळ, कसाईवाडा, कुर्ला, मुंबई असे नाव सांगितले. त्याच्याजवळील मोबाईलबाबत विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली.

पोलीसानी संशयितास पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यास मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तपास हवालदार अजय पाटील व अमोल भोसले करीत आहेत.