Ticker

6/recent/ticker-posts

ट्रकाने स्कूटीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू..



प्रतिनिधी:- हितेश मेश्राम 

सालेकसा : - आमगाव ते सालेकसा मागावर मुंडीपार येथे एक भरधाव ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक निष्काळजीपणे चालवून एका स्कूटी ला मागून धडक दिल्याने स्कूटी सवार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेतील फिर्यादी, जखमी डोमेश्वर अशोक मनघटे वय ३८ वर्ष रा. पानगांव ता. सालेकसा जि. गोंदिया यांनी पो.स्टे. ला येवुन तक्रार दिली की, दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ चे ११/३० वा. सुमारास फिर्यादी/जखमी हा मृतक नामे सौ. कविता दिलीप नंदेश्वर वय ५८ वर्ष रा. पानगांव हीचे सोबत स्कुटी मो.सा. क्र. एम. एच.३५ - ७६७० ने पानगांव येथुन कावराबांध येथे जात असतांनी मुंडीपार गावाजळ गराडे

किराना दकानाचे समोर डांबरी रोड वर ट्रक क्र. सी.जी. ०८ ए. ई. ९२२२ चा चालक याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, लापरवाहीने चालवुन फिर्यादी/जखमी चालवित असलेल्या स्कुटीला मागुन घडक देवुन पळून गेल्याने फिर्यादी यास जखमी केल्याने तसेच मृतक हिला गंभीर जखमी करुन मरणास कारणीभुत झाल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पो. सटे. सालेकसा येथे अप क्र. २४७/

२०२४ कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), १०६ भा.न्या.सं. सहकलम १८४, १३४ (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर अपघातातील ट्रक सी.जी. ०८ ए. ई. ९२२२ व सदर ट्र क चा आरोपी चालक यास ताब्यात घेण्यात आले असुन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे घटनास्थळावरील वाहतुक सुरळित चालु करण्यात आली असुन परिसरात शांतता आहे..