प्रतिनिधी :- सचिन ठुले
ता.पुर्णा .पुर्णा शहरातील महावीर नगर मधील महाराष्ट्र बँकेत सर्वसामान्य ग्राहकांची कामे वेळेवर होत नसल्यांच्या तक्रारी येत असून बँक ग्राहकांतुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासनाच्या विविध योजना उपलब्ध आहेत परंतु बँकेत खाते उघडणे व इतर कामासाठी अडवनुक होत असल्याच्या तक्रारी आहेत. खाते उघडणे तब्बल 20 ते 25 दिवस लागत आहेत बँकेतील काही कर्मचारी ग्राहकांशी उद्धट पणे वागनुक करत असलेल्या च्या तक्रारी वरीष्ठांकडे करण्यात आलेल्या आहेत. तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे मागील काही महिन्यापासून एटीएम बंद असल्याने ग्राहकांची मोठी हेळसांड होतांना दिसुन येत आहे.या कडे बँकेचे वरीष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत आहेत या प्रश्नांकडे तात्काळ लक्ष देण्यात यावे अशी मागणी ग्राहकातून व्यक्त होत आहे.





Social Plugin