बुध : दि. [प्रकाश राजेघाटगे ]
रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालय ,पुसेगाव येथे पुसेगावचे मंडल अधिकारी मा. अशोक साबळे यांचा ' उत्कृष्ट मंडल अधिकारी' म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभप्रसंगी साबळे साहेबांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. ते आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, " तरुणांनी वाचनाचा ध्यास घेतला पाहिजे. वाचनाचा छंद जोपासता आला पाहिजे. कोणतेही काम पूर्ण निष्ठेने केले तर यश हमखास मिळते. येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांची मी नम्रपणे चौकशी करतो. प्रामाणिकपणे काम केल्यावर नक्की त्याचे फळ मिळते . दिलेले काम वेळेच्या अगोदर पूर्ण करणे गरजेचे आहे. " असे मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले.
या सत्कार समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र भोसले हे होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे सातारा जिल्हा समन्वयक मा. डॉ. नंदकुमार माने, महाविद्यालयातील ग्रंथपाल रयत शिक्षण संस्थेचे अजीव सदस्य डॉ. संजय क्षीरसागर , उपप्राचार्य डॉ.अनिल जगताप व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण कुंभार यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लालासाहेब पवार यांनी केले तर सूत्रसंचालन मराठी विभागातील प्रा. महेश आवळे यांनी केले. आभार प्रा. किरण कुंभार यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.





Social Plugin