Ticker

6/recent/ticker-posts

चर्मकार समाजातील युवकानी समाज कार्या करीता पुढे यावे --अमर तांडेकर


प्रतिनीधी रविंद्र गव्हाळे मलकापुर

बुलडाणा -- येथे राष्ट्रीय चर्मकार युवा आघाडीच्या वतीने समाज जागृती अभियान अंतर्गत युवकांना मार्गदर्शन करताना प्रदेश अध्यक्ष  अमर तांडेकर यांनी युवक युवतींनी समाजाला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या  चळवळी मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष दादासाहेब काटकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष  रवींद्र खैरे  होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात युवा आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ.महेश रिठे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रीय चर्मकार  महासंघाचे  जिल्हाध्यक्ष प्रा. डी. आर. माळी यांनी संघटनेच्या जिल्हाभरातील विविध उपक्रम ज्यामधे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गुरू रविदास स्मारकाची उभारणी, प्रस्तावित गुरू रविदास सभागृह, विविध प्रश्न सोडविण्यात संघटनेचे योगदान, सामूहिक विवाह, वधुवर परिचय मेळावा असे विविध उपक्रम राबविले या बाबतचा आढावा घेतला. 

रवींद्र  खैरे यांनी उपस्थितांच्या सूचना ऐकुन घेतल्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनात संघटना काय भूमिका घेणार व त्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडवल्या शिवाय शांत बसणार नाही असे आश्वासन दिले. यावेळी बबनराव कुमठे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल सतीश करंगे , श्रीमती कमलताई पसरटे, शासकीय सेवेत नियुक्ती झाल्या बद्दल कु.भाग्यश्री राजेश खुरदे , माध्यमिक शिक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल विशाल रामकृष्ण वानेरे यांचा भारतीय संविधान देऊन  सत्कार करण्यात आला. या वेळी शिक्षक आघाडी  जिल्हा उपाध्यक्ष पदी अशोक चिंचोले यांना नियुक्ती देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब काटकर यांनी संघटनेच्या स्थापने पासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेताना संघटन वाढीसाठी नेत्यांनी  व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची यशोगाथा मांडतानाच भविष्यात काय केले पाहिजे हे देखील कठोर शब्दात परखड मत व्यक्त केले. यावेळी  अतिथी यांना सौ. चांदोरे ताई, सौ. प्रियंका ताई चऱ्हाटे , सौ.सरोज ताई सरसरे, सौ. करंगे ताई यांनी राख्या बांधून औक्षण केले . 

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदर्शन भागवत तांदळे, विदर्भ संघटक यांनी तर सूत्र संचलन युवा आघाडीचे जिल्हा सचिव गणेश खनसरे यांनी केले. यावेळी प्रभाकर आमले , प्रा. आर एस. बशीरे आत्माराम चांदोर, शिक्षक आघाडी जिल्हा अध्यक्ष समाधान पठ्ठे, प्रा.डॉ. लक्ष्मणराव शिराळे, आनंदराव दुतोंडे, गोविंदराव हीरेकर, बाळासाहेब वानेरे, सुरेश कावळे,  शालीग्राम  इंगळे, दशरथ बडगे, समाधान माळी, देवलाल बडगे, ऍड राजेश खुरदे,  विलास पसरटे,  भगवान मांडवे, प्रेमदास काकडे,  दिपक पुरभे, उमेश पुरभे, माठे साहेब, शालीग्राम गवई,श्रीकृष्ण पानझडे, चंदासिंग  बिबे, झनकलाल पिंपळे, लालचंद डोंगरे, चंदनसेठ पसरटे, अशोक चिंचोले, डॉ. राहुल माळी, चेतन बोर्डे यांच्या सह मोठ्या संख्येने युवक महिला पुरुष यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले..