प्र.आनंद दहागांवकर/गडचिरोली,
गडचिरोलीः 27 ऑगस्ट 2024, एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मांतय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी बेडके यांचे अभिनंदन केले आहे.महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यात कोल्हापूर येथील सागर बगाडे व गडचिरोली जिल्ह्यातील एम. ए. बि. एड. असलेले मांतय्या बेडके यांचा समावेश आहे.५ सप्टेबर रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मांतय्या बेडके यांना रजत पदक व ५० हजार रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
एटापल्ली ब्लॉकच्या दुर्गम जाजवंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मांतय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला आहे. महाराष्ट्रातील फक्त दोनच शिक्षकांना हा सन्मान मिळाला असून बेडके हे त्यापैकीच एक आहेत. जिल्हा परिषद गडचिरोलीला त्यांचा आणि त्यांनी या अतिदुर्गम आदिवासी भागात दिलेल्या सेवांचा अभिमान आहे. आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली





Social Plugin