Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्याध्यक्षपदी रमेश अधिकारी तर महिला आघाडी कार्याध्यक्षपदी मनीषा मडावी


प्र.आनंद दहागावकर/गडचिरोली,

गडचिरोली : 28 ऑगस्ट2024,राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो) गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्षपदी रमेश अधिकारी तर महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्षपदी मनीषा मडावी यांची संघटनेच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात विविध समस्या व सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या अनेक न्याय व हक्काच्या विषयावर विविध सामाजिक व लोक हिताचे काम प्रामाणिकपणे करण्यात येत आहे. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्येवर काम करण्यासाठी चामोर्शी येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते रमेश अधिकारी यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी व गडचिरोली येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा मडावी यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटना गडचिरोली महिला जिल्हा कार्याध्यक्षदी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी नियुक्ती केली.

या नियुक्ती बद्दल राष्ट्रीय मानवअधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल, राष्ट्रीय मानव अधिकार संघटना महिला अध्यक्ष पौर्णिमा, राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेन्द्र विश्वास, राज्य सल्लागार नाना नाकाडे, विदर्भ महिला आघाडी मानवाधिकार संघटना अध्यक्ष पायल कापसे, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, भामरागड तालुका राष्ट्रीय मानवाधिकार संघटना अध्यक्ष भीमराव वनकर, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहे.