गाव मिरवणुकीतून निवृत्त सैनिकास केले अभिवादन.
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सैनिकांची परंपरा असणाऱ्या फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी (ढवळ) या गावांमध्ये गावचे सुपुत्र सोमनाथ लालासो चव्हाण यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आणि रविंद्र प्रकाश नलवडे यांच्या महाराष्ट्र एस. आर. पी. एफ. मधील नवनियुक्तीनिमित्त शेरीचीवाडीतील समस्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शेरीचीवाडी हे फलटण तालुक्याच्या नैऋत्य दिशेस वसलेले १२०० लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे. परंतु या गावांमध्ये आजी-माजी सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या गावचा एक सुपुत्र शहीद नवनाथ ढेंबरे यांना देशरक्षण करताना वीरगती प्राप्त झाली आहे.
त्यांचेच परममित्र असणारे श्रीयुत सोमनाथ लालासो चव्हाण हे सन 2000 साली भारतीय सैन्य दलात रुजू झाले. जवान सोमनाथ हे 31 जुलै 2024 रोजी 24 वर्षांच्या सेवेतून हवालदार पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी बी. ई. जी. ग्रुपमध्ये ट्रेनिंग घेऊन कुपवाडा जम्मू-काश्मीर, डेहराडून, सागर आणि बिकानेर अशा विविध ठिकाणी अत्यंत निष्ठेने सेवा बजावली आहे. तसेच रविंद्र प्रकाश नलवडे यांनी मराठा लाईट इन्फंट्री सैन्यदलात 17 वर्ष सेवा बजावून सन 2020 मध्ये घेतलेल्या निवृत्तीनंतर चार वर्ष सतत परिश्रम घेऊन 1 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र सी. आर. पी. एफ. मध्ये नियुक्त झाले आहेत. दरम्यानच्या काळात गावातील विविध सामाजिक कार्यात ते सहभागी राहिलेले आहेत.
या दोनी सुपुत्रांच्या गौरवानिमित्त शेरेचीवाडीच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांची गावातून घोड्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यासाठी गावातील अनेक ग्रामस्थ महिला व पुरुष उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सत्कारप्रसंगी फलटण दूध संघाचे संचालक हणमंतराव चव्हाण, माजी सैनिक राजेंद्र पवार व हंबीरराव मोहिते यांची भाषणे झाले. माजी सरपंच उज्वला गुरव यांच्या हस्ते वीर माता कमलबाई ढेंबरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संजय ढेंबरे, भाऊसाहेब मोहिते, रवींद्र मोहिते, राहुल नलवडे, दिगंबर पवार, सोमनाथ डांगे, बबनराव फडतरे, मनोज नलवडे, शरद शिंदे, संदीप शिंदे यांच्या हस्ते गावातील सर्व माजी सैनिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या समारंभ प्रसंगी फलटण दूध संघाचे माजी संचालक श्रीरंग चव्हाण, माजी सरपंच केशव मोहिते, माजी सरपंच किसन शिंदे, माजी उपसरपंच दिनकर चव्हाण, संदीप पवार, दिपक शिंदे, महेश चव्हाण, शिवाजी फडतरे आदि अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित चव्हाण यांनी केले. सचिन शिंदे यांनी आभार मानले तर संपूर्ण कार्यक्रमासाठी गावातील तरुण मंडळांनी मोठे परिश्रम घेतले.





Social Plugin