Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांची मलकापूर उपविभागीय कार्यालयावर धडक



पिकविमा, सोयाबीन-कापसाचा भाव फरक, कर्जमुक्ती व फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी आक्रमक भूमिका

पिकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती, फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी आज ०३ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. 

प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर 

मलकापूर परिसरात डॉ.प्रफुल्ल पाटील नामक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. हा व्यापारी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सोयाबीन-कापूस पैसे न देता खरेदी करून फरार झाला आहे. या व्यापाऱ्याने जवळपास ९० कोटी पेक्षा रकमेचा शेतकऱ्यांना गंडा घातला आहे. या व्यापाऱ्यांची संपत्ती विकून शेतकऱ्यांची संपूर्ण वसूल करून द्यावी अशी आक्रमक भूमिका यावेळी घेतली. तसेच शेतकऱ्यांना गेल्यावर्षीचा १००% पिकविमा मिळावा तसेच नुकसान भरपाई मिळावी, जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे, वन्यप्राण्यांनी शेतापिकांच्या केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, गेल्यावर्षीचा सोयाबीन-कापसाला प्रति क्वि.३०००/- रु. भाव फरक तातडीने मिळावा, तातडीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार राहुल तायडे व मलकापूर शहरचे ठाणेदार श्री.गिरी यांच्या चर्चा करून निवेदन देण्यात आले.आज शांततेच्या मार्गाने आलो आहे, लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.

  या मोर्चाला दामोदर शर्मा, अमोल राऊत, गजानन भोपळे, सचिन शिंगोटे, निलेश नारखेडे, रणजित डोसे, दत्ता पाटील, भागवत धोरण, विजय बोराडे, उमेश राजपूत, समाधान भातुरकर, राहुल मोरखेडे, विवेक पाटील,ललित डव्हले, अतुल पाटील, प्रवीण पाटील, अतुल नारखेडे, यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.