Ticker

6/recent/ticker-posts

प्रकल्पग्रस्त समिती ने घेतली दखल



प्रतिनिधी --संजय भरदुक मंपीर

    दि. २९ जुलै रोजी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती वाशीम (विदर्भ प्रदेश) च्या शिष्टमंडळ यांनी मा. दादासाहेब दराडे उपजिल्हाधिकारी भूसंपादन,पुनर्वसन वाशीम यांची भेट घेतली. वाशीम जिल्ह्यातील गेल्या तीन ते चार महिन्यापासून मय्यत प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचे वारसांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळाले नाही. अशा तक्रारी समिती कडे आल्यामुळे समिती शिष्टमंडळ यांनी मा. उपजिल्हाधिकारी साहेब वाशीम यांची भेट घेतली. 

 यावेळी या विषयावर सविस्तर चर्चा झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट याचिका दि. २३ जून २०२२ रोजीच्या आदेशानुसार व ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चा नंतर मय्यत प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचे वारसांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशा प्रकारे शासनाचे पत्र असल्यामुळे मय्यत प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचे वारसांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणे बंद केले आहे. 

यासंदर्भात समिती शिष्टमंडळ यांनी यावेळी सविस्तर चर्चा केली. यावेळी मा. दादासाहेब दराडे उपजिल्हाधिकारी साहेब वाशीम व समिती शिष्टमंडळ हे वरिष्ठांकडे उपसचिव, मंत्रालय मुंबई, येथे मय्यत प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या वारसांना न्याय मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. 

   यावेळी समिती शिष्टमंडळ मध्ये विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती वाशीम (विदर्भ प्रदेश) चे वाशीम जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे, मय्यत प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचे वारस संतोषराव सिताराम भिसडे, संतोष आत्माराम भिसडे, केशव कचरु भिसडे व अशोकराव मगर, संजय पाटील इंगोले,विठ्ठल सदार इ. उपस्थित होते.