Ticker

6/recent/ticker-posts

अंबड येथे क्रांतीदिनी ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदारांचं सत्याग्रह आंदोलन.



अंबड प्रतिनिधी आकाश जळके

अंबड: दिनांक 9 ऑगस्ट 2024 क्रांती दिनाचे औचित्य साधूनज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदारांनी सत्याग्रह आंदोलन केले. अन्याया विरुद्ध ब्रिटिश सत्तेच्या जोखंडातून मुक्त करण्यासाठी म.गांधी यांनी इंग्रजांना' चले जाव'

' भारत छोडो आंदोलन' 9 ऑगस्ट1942 सुरू रोजी सुरु केले. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले प्राप्त झाले. स्वातंत्र प्राप्त होऊन आज रोजी 75 वर्षे झाले. भ्रष्टाचार, व घोटाळे यामुळे शासन व्यवस्था पोखरल्या गेली व सर्वसामान्य माणूस हतबल झालेला आहे. इंग्रज बरे होते अशी म्हणण्याची वेळ दुर्दैवाने आलेली आहे.   दुष्काळग्रस्त मराठवाड्यात मल्टीस्टेचं पिव फुटलं. ठेवीदारांना दिवसाढवळ्या लुटलं जात आहे. केंद्रशासन मान्य सर्व मल्टीस्टेट आहे . शासनानेच जनतेला लुटण्याचा परवाना दिला असं वाटत आहे . आर्थिक भ्रष्टाचार करून. ठे/वीदारांचा कष्टाचा पैसा हडप करून,आर्थिक संकटात टाकून आत्महत्याची वेळ आणलेली आहे . राज्य शासन व केंद्र शासन ठोस कारवाई करत नाही. त्यामुळे ठेवीदारा हतबल झालेले आहेत . अनेक ठेवीरांचा मानसिक तणावामुळे बळी गेलेला आहे. शासनाकडे विनंती अर्ज उपोषण आंदोलन करूनही शासन मल्टीस्टेटवर कारवाई करायाला तयार नाही. मल्टीस्टेटचे संचालक फरार आहे. पोलीस प्रशासन त्यांच्यावर कठोर कारवाई करत नाही.

    मराठवाड्यात जवळपास चार हजार कोटी रु ठेवी घेऊन चार लाख ठेवीदारांना उध्वस्त करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टे सुरेश कुटे यांनाभारतीय जनता पक्षाने पक्षात प्रवेश देऊन कारवाई करण्यास विलंब करत आहे. शासनाच्या ठेवीदारावर होत असलेल्या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात अंबड येथील ज्ञानराधा ठेवीदारांनी नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी अंबड तहसील कार्यालय येथे सत्याग्रह आंदोलन करून आपल्या मागण्याचे निवेदन दिले आहे. त्यांचा कष्टाचा पैसा मिळण्यासाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना पासून उपोषण व धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. निवेदनावर ठेवीदार न्याय हक्क कृती समितीचे अध्यक्ष भगवान रेगुडे, उपाध्यक्ष दिनकर उघडे, सचिव डॉक्टर एल बी सावंत, अंबादास खोमणे, तात्यासाहेब वाघमारे, गुलाबराव उबाळे, कृष्णकुमार कोटंबे, कार्तिक सरकार , प्रशांत सबनीस, कैलास करपे बालाप्रसाद राठी,  बद्रीनाथ राठी, सुरेखा चव्हाण, कासाबाई वराडे, कमलबाई खरात, विशाल शेटे, हिराला लठ्ठे , शेख जब्बार, लक्ष्मण धनाडे ,  चांगदेव ढेरे, सहदेव वाघुंडे संजय लिमसे, अमित सय्यद, विष्णू काटोते, नारायण खर्जुले, जयाजी हरिचंद्र, अंकुश सोनवणेस्वाक्षऱ्या आहेत.