-प्रतिनिधी --संजय भरदुक मंपीर
दिनांक.09/08/24 वेळ सा. 5:30 मी. जिल्हा परिषद कृषी विभाग येथे कार्यरत असलेले कृषी अधिकारी व विस्तार कृषी अधिकारी यांनी आज शेतीनिष्ठ शेतकरी रवींद्र गायकवाड यांच्या नैसर्गिक शेती प्रकल्पला भेट दिली यामध्ये संतोष चौधरी कृषी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम, इंगोले साहेब कृषी अधिकारी पंचायत समिती मानोरा, विस्तार कृषी अधिकारी पंचायत समिती कारंजा या टीमने आज रवींद्र गायकवाड यांच्या शेतामध्ये देशी कुक्कुटपालन व बायोगॅस निर्मिती प्रकल्प, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, देशी गोपालन, विहीर पुनर्भरण, इंडो इजराइल पद्धतीने संत्राफळबाग लागवड व निंबू फळबाग लागवड
तसेच मिश्र पद्धती फळपिक मध्ये शेवगा, केसर, आंबा ,बाळा नगर सिताफळ, सरदार पेरू लागवड, बांधावरती वृक्ष लागवडीमध्ये नारळ, करवंद, आधी विषयाची पाहणी केली तसेच रवींद्र गायकवाड यांच्या शेतामध्ये कार्यरत असलेली शेत बांधावरील प्रयोगशाळा विषयी माहिती घेतली तसेच रवींद्र गायकवाड यांच्या शेतातील फळ रोपवाटिका ला भेट देऊन विविध फळझाडांविषयी माहिती घेतली व रवींद्र गायकवाड यांना मार्गदर्शन केले
यामध्ये विस्तार कृषी अधिकारी पंचायत समिती कारंजा येथे कार्यरत असलेले राठोड साहेब यांनी बायोगॅस निर्मिती संदर्भातील तांत्रिक बाबी आदी विषयाविषयी रवींद्र गायकवाड यांना मार्गदर्शन केले तसेच कृषी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम येथे कार्यरत असलेले संतोष चौधरी यांनी बेडवरील सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापन आदी विषयाविषयी चर्चा केली कृषी अधिकारी पंचायत समिती मानोरा येथील इंगोले साहेब यांनी रवींद्र गायकवाड यांचे अभिनंदन केले व फळ पीक व्यवस्थापन मधील बारकावे आदी विषयावर ती चर्चा केली असे असल्याचे ग्रामीण कृषि प्रतिनिधी गायवळ यांनी कळविले





Social Plugin