ग्रामीण भागातील नागरिकांचा जळगाव प्रवास होणार सुखकरआ संजय गायकवाड यांनी केली होती मागणी
प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर
मोताळा तालुक्यातील वाघजळ व मलकापूर तालुक्यातील दाताळा या दोन ठिकाणी जलद एसटी बसेसला थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. सदर ठिकाणी थांबा मिळावा याकरिता बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी पाठपुरावा केला होता.
मोताळा तालुक्यातील वाघजळ फाटा हा महत्त्वाचा फाटा आहे या ठिकाणी धामणगाव बढे रोहिनखेड, मूर्ती गावातील प्रवासी सातत्याने बुलढाणा, जळगाव, धुळे व मलकापूरच्या दिशेने प्रवास करत असतात मलकापूर येथे रेल्वे स्टेशन असल्याने अनेक वेळा वाघजळ व दाताळा या फाट्यावरून प्रवाशांना रेल्वे प्रवास करायचा असतो त्यामुळे आपली गाडी गाठण्यासाठी जलद प्रवास आवश्यक असतो मात्र या ठिकाणी जलद एसटी बस ला थांबा नसल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. सदर विषयाचे गांभीर्य पाहता आमदार संजय गायकवाड यांनी याविषयी राज्य परिवहन विभागाशी चर्चा करून जलद एसटीला या ठिकाणी थांबा देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने राज्य परिवहन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील या मार्गावरील सर्व आगर प्रमुखांना पत्र पाठवून यासंदर्भात तशा सूचना दिल्या आहेत.
सदर नव्या आदेशाने मोताळा व मलकापूर तालुक्यातील शेकडो प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार आहे सदर विषयाचा पाठपुरावा केल्यामुळे दोन्ही तालुक्यातील नागरिकांच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचे आभार व्यक्त केले जात आहे.





Social Plugin