Ticker

6/recent/ticker-posts

गुन्हे दाखल होत नाही तो पर्यंत उपोषण माघार नाही.- करडे, आठवले.


ग्रामीण प्रतिनिधी मारोती गाडगे/कटचिंचोली 

गेवराई (बीड):-ता. ०५/०८ सोमवार गेवराई तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत एम आर जीएस तसेच इतर कामात मोठा घोटाळा झाला असुन काम न करताच तसेच मयत व्यक्तीच्या नावावर लाखो रुपये उचलण्यात आले असून याची सकल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आरपीआयचे सुमेध करडे,तसेच विनोद आठवले यांनी केली आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील धोंड्राई पाठोपाठ तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत एम आर जीएस अंतर्गत कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे दिसून येत असून मोहुगणी, वृक्ष लागवड, जलसिंचन विहीर, तुती लागवड, पादन रस्ते, सिमेंट रस्ते, अशे अनेक कामे नित्कृष्ट दर्जाचे केले असून मयत व्यक्तीला बोगस कागदपत्र तयार करून त्यांच्या नावावर लाखो रुपये उचलण्यात आले असून तसेच रस्त्याचे कामे न करताच पूर्ण बिल उचलण्यात आलेले आहेत यामध्ये रोजगार सेवकाने बोगस मस्टर काढून त्या वर इंजिनियर यांनी कसल्याही कामाची सहनिशा न करता ऑफीस मध्ये बसून बिले पास करण्यात आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या वर डोळे झाकून सह्या केल्या आहेत तसेच मयत व्यक्ती हा २०२० साल मयत झाला असून त्याची बोगस कागदपत्रे तयार करून लाखो रुपये खात्यावर जमा करण्यात आलेले आहे अशा अनेक हो उचलण्यात आलेले आहे आशावर जिल्हाधिकारी साहेब यांनी बेधडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी आर पी आय चे सुमेध करडे, विनोद आठवले यांनी मागणी केली आहे.

लहुजी साळवे क्रांती सेनेचा पाठिंबा. - दादाराव रोकडे.

आरपीआयच्या वतीने सुमेध करडे व विनोद आठवले तलवाडा ग्रामपंचायत समोर उपोषणास बसले असून तलवाडा ग्रामपंचायत ने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला असून मयत व्यक्तीच्या नावाने लाखो रुपये उचलण्यात आलेले आहे मोहुगणी, तुती लागवड, जलसिंचन विहीर, रस्त्याचे काम, असे अनेक काम मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला असून संबंधित सरपंच जोशी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होत नाहीत लहुजी साळवे क्रांती सेनेचा सुमेध करडे व विनोद आठवले यांच्या उपोषणास पाठिंबा राहील असे जिल्हाध्यक्ष दादाराव रोकडे यांनी म्हटले आहे.