Ticker

6/recent/ticker-posts

जरांगे पाटील यांनी ठरवलं गेवराई तालुक्याचा आ.सुनिल ठोसर यांना पाटील यांच्या कडून उमेदवारीची शक्यता.



ग्रामीण प्रतिनिधी मारोती गाडगे/कटचिंचोली 

गेवराई(बीड) :ता.०४/०८.रविवार सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून लवकरच विधानसभा निवडणुकी च्या तारखे देखील निश्चित होतील. अशातच गेवराई मतदार संघामध्ये संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी प्रकर्षाने लढा उभा केलेला आहे. त्यामुळे गेवराई मतदार संघात बदल हा निश्चितच आहे. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील म्हणतात, विधानसभा निवडणुकीत श्रीमंत मराठ्यांना पाडा त्याचमुळे सध्या तरी सामान्य गरीब शेतकरी मराठा कुटुंबातून आलेल्या सुनील ठोसर यांच्या नावाची चर्चा जनतेतून ऐकावयास मिळत आहे. 

सुनील ठोसर हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून ते सर्व परिचित असलेल्या गेवराई तालुक्यातील या छोट्याशा सिंदखेड गावचे रहिवासी आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन गेली अनेक वर्ष समाजकारणात सक्रिय असून त्यांच्या माध्यमातून कोविड १९ लॉक डाऊन काळामध्ये गोरगरीब जनतेपर्यंत राशन किट असो किंवा लॉकडाऊन काळामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक कर्ज पिक विमा शासनाच्या धोरणानुसार वाटप करण्यात यावी यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, घरकुलधारकांना मिळणाऱ्या लाभाच्या रकमेसाठी वेठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यां वर कारवाई करण्यासाठी केलेले आंदोलन असो तसेच श्रावण बाळ इंदिरा गांधी संजय गांधी निराधार या गोरगरिबांच्या मानधना साठी सुरू करण्यात आलेल्या योजनांचा लाभ हा लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी व त्यांना पगार चालू करण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, किंवा दिव्यांग बांधवांचे प्रश्न असो तशीच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात त्यांची अतुलनीय योगदान आहे असल्यामुळे तागायत गोरगरीब जनता ही विसरलेली नसून, सुनील ठोसर हे जनतेची सेवक म्हणूनच सर्व परिचित आहेत. सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारा, शेतकरी, दिनदुबळ्यांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारा निस्वार्थी भावनेतून जनतेची सेवा करणारे व्यक्तिमत्व, तसेच राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून जनतेशी थेट संपर्क व त्यांच्याशी सात ला जाणारा संवाद यामुळे सर्व परिचित असणारे सुनील ठोसर हे गेवराई विधानसभा मतदार संघातील जनतेच्या मनातील उमेदवार असलेल्या चर्चेस उधाण आले असल्यामुळे प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहे. प्रस्थापितांची घराणेशाही मोडी स काढण्यासाठी सुनील ठोसर या नवख्या तरुण नेतृत्वास निवडून देण्याची चर्चा मतदारसंघातील जनतेतून जोरदार सुरू आहे. गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य करत असताना सर्व जाती धर्मातील अठरापगड जातीच्या युवकांची फळी तयार करून अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून गोरगरीब पीडित जनतेस न्याय देण्याचे काम सुनील ठोसर यांनी वेळोवेळी केले आहे. याच निस्वार्थी जनसेवेमुळे मतदार संघातील जनतेमध्ये त्यांच्या प्रति वेगळीच क्रेझ निर्माण झाली असून सुनील ठोसर हे गेवराई विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्यामुळे व मतदार संघातील जनतेचा कौल पाहता प्रस्थापित राजकारणी, तसेच श्रीमंत मराठा, विरुद्ध सर्वसामान्य शेतकरी पुत्र, गरीब मराठा अशीच रंगतदार लढत गेवराई विधानसभा मतदारसंघात पहावयास मिळणार हे निश्चित आहे. 


संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यात प्रकाशाने सहभागी होणारे व मनोज दादा जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक असल्याने तसेच संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील म्हणतात विधानसभा निवडणुकीत श्रीमंत मराठ्यांना पाडा त्यामुळे सध्या तरी सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुनील ठोसर यांच्याच नावाची जोरदार चर्चा जनतेतून ऐकवयास मिळत आहे. तसेच त्यांनी आजपर्यंत गोरगरीबांच्या सेवेत तत्पर राहून न्याय देण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे अशा गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच न्यायासाठी तडफदार नेतृत्व म्हणून सुनिल ठोसर यांना एकदा संधी देऊन गोरगरिबांच्या सेवेत दाखल करावे अशी चर्चा सध्या सुरू आहे.