Ticker

6/recent/ticker-posts

कला व वाणिज्य महाविद्यालयात महसूल पंधरवडा कार्यक्रम संपन्न



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभाग व तहसील कार्यालय खटाव  यांच्या संयुक्त विद्यमाने 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ' योजना हा कार्यक्रम संपन्न झाला. 

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पुसेगाव येथील विभागीय मंडल अधिकारी. अशोक साबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाच्या विविध  कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आवश्यक असणारी कागदपत्रे  या बाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. ‌महसूल विभागाशी संबंधित नागरिकाच्या कामकाजाबाबत प्रशासन नेहमीच मदत व मार्गदर्शन करीत असते .नागरिकांच्या समस्याचे निराकरण महसूल विभागातील सर्व अधिकारी हे सकारात्मक  दृष्टीने काम करत असतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना आपले काम यशस्वी झाल्यानंतर आनंद होत असतो असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा ‌डॉ. संजय क्षिरसागर यांनी केले. तर अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले , ' महसूल विभागातील कल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्य माणसाचा विकास होतो. त्यामुळेच  सरकार विविध योजनांची अंमलबजावणी करीत असते . या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन  केले. या कार्यक्रम प्रसंगी  तलाठी श्री. अमोल  जाधव, .तलाठी श्री .हिरके, कोतवाल श्री. सुरेश कंठे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.आर. धोंगडे यांनी केले. तर आभार प्रा. एल. के. पवार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छायाचित्र -पुसेगाव येथील मंडल अधिकारी श्री. अशोक साबळे मार्गदर्शन करताना सोबत व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र भोसले समवेत डॉ.संजय क्षीरसागर श्री.अमोल जाधव, श्री.हिरके, प्रा.एच.जी निमसे, प्रा.डी.एम बहिरम