बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीदूतांनी केले ड्रोनद्वारे फवारणी चे प्रात्यक्षिक.
सोयाबीन हे खरीफ पिकामधील एक महत्त्वाचे पीक आहे. जस जसे सोयाबीन मोठे होत जाईल तसाच रोगांचा व प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे औषध फवारणी करणे गरजेचे असते. परंतु पिकाची वाढ जास्त व दाट असल्याने सापाच्या भीतीने शेतकरी फवारणीसाठी पिकात पाय ठेवत नाहीत. यामुळे फवारणी करणे अशक्य होते. त्यावरच उपाय म्हणून ड्रोनद्वारे फवारणी केली जाऊ शकते. अभिजित घाडगे यांच्या सोयाबीन पिकात सदर प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी काही शेतकरी व ड्रोन ऑपरेटर हे उपस्थित होते.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, सुमित बागुल, ओंकार खेडकर, गौरव रायकर, अमितेश बोदडे, आदित्य घेवारे यांनी हे प्रात्यक्षिक पाडले.





Social Plugin