बुध दि .[प्रकाश राजेघाटगे]
ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीदूतांनी काटेवाडी येथील सोयाबीन प्लॉट ला भेट देऊन सोयाबीन बीज उत्पन्नाबद्दल माहिती घेतली.
यावेळी बीज उत्पादक सौरभ कचरे व विकास पांडेकर व शेतकरी संघातील इतर शेतकरी उपस्थित होते. फौंडेशन सीड पासून उत्तम प्रतीचे बीज उत्पादन कसे घेतले जाऊ शेकते याबद्दल कृषिदूतांनी बीज उत्पादका कडून माहिती घेतली. उत्पन्नासाठी केलेल्या सोयाबीन पेक्षा सोयाबीन चे बीज उत्पादन शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या वरदान ठरत आहे. सोयाबीन पेक्षा सोयाबीन बीज याला बाजार भाव तीनपटीने जास्त असल्याने शेतकऱ्याचा फायदा होतो.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम व प्रा. विक्रम साबळे सर ( BOT DEPARTMENT ) यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, सुमित बागुल, ओंकार खेडकर, गौरव रायकर, अमितेश बोदडे, आदित्य घेवारे यांनी माहिती घेतली.





Social Plugin