Ticker

6/recent/ticker-posts

नाशिकच्या ‘गोदावरी’ला पूर


प्रतिनिधी हैदर अली शेख

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झालाय. नाशिकच्या 'गोदावरी' नदीला पूर आलाय. महाराष्ट्रभरात मुसळधार पाऊस होतोय. असं म्हणता येईल. 

बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होतोय. पुण्यातही जोरदार पाऊस होतोय. डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पुणे शहरासह जिल्हा, सातारा आणि रायगडला हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये देखील काल रात्रीपासून पाऊस होतोय. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. तसंच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नाशिक, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होतोय.

कोल्हापुरात मुसळधार पाऊस राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पहाटे उघडला आहे. सहा नंबरच्या स्वयंचलित दरवाज्यातून 1400 क्युसेकने विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. सध्या कोल्हापूर आणि परिसरात पावसाची उघडीप आहे. मात्र धरण क्षेत्रात अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहेत.


नागपुरात सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. पूर्णतः ढगाळ आणि पावसाचं वातावरण आहे. नागपूरसह परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्या पासून दिलासा मिळाला आहे.