Ticker

6/recent/ticker-posts

सैनिकांना राखी बांधून जिजाऊ ज्ञान मंदिरच्या मुलींचे अनोखे रक्षाबंधन".


रायपूर प्रतिनिधी  मोहम्मद रफिक 

    राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड, बुलडाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड भट/रायपूर येथे आज दिनांक 22/08/2024 वार गुरुवार ला देशसेवा केलेल्या आजी - माजी सैनिकांसाठी "धागा शौर्य का, राखी अभिमान की" या उपक्रमांतर्गत परिसरातील सर्व सैनिक तसेच पोलीस प्रशासनातील कर्मचारी यांना राख्या बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत अनोखा रक्षाबंधन सोहळा संपन्न झाला.

       यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा भाऊसाहेब शेळके (बाबा) होते तर प्रमुख अतिथी म्हणून स. पो. नि. मा. राजपूत साहेब, ठाणेदार, पोलीस स्टेशन रायपूर होते तर प्रमुख मान्यवर म्हणून देशाची सेवा करणारे आजी- माजी सैनिक यांनी बहुसंख्येने उपस्थिती होती. यात मा.रामेश्वर सोळंकी अध्यक्ष त्रिदल सेना चिखली, मा सोहम खंडागळे, मा रामदास जंजाळ, मा श्रीकृष्ण बंगाळे,मा. शिवराम निकम, मा भोजराज देशमुख, मा नामदेव सुरडकर मा.सुनील तायडे मा. अशोक भुतेकर, मा. पंढरीनाथ बुरकुल, मा. प्रकाश कव्हळे,मा. संजय इंगळे, मा.युवराज तिवारी, मा.अशोक काकडे,मा.रमेश साळवे,मा. दिगंबर म्हस्के, मा. संतोष देशमाने,मा. वैभवसिंग सोळंके, मा.साहेबराव भंडारे, मा. राजेश सिरसाट,मा.अमोल तायडे, मा.विशाल सिरसाट, मा. बन्सीलाल हनवते, मा. सागर निकम, मा. देवलाल कव्हळे, मा. विशाल पंडित, मा. आकाश जुंबड तसेच हेमंत देशमुख CO राजर्षी शाहू इंडस्ट्री बुलढाणा इत्यादीची उपस्थित होती.

 सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक शिवराम निकम यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधत सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला सिद्ध करत आपण हिऱ्याप्रमाणे घडलो पाहिजे. तसेच आपली दिनचर्या कशी असायला पाहिजे. निती-नियम व वेळेचे महत्व जमले पाहिजे. ध्येयवादी असलं असलं पाहिजे. 

     तसेच सैनिकांना सन्मान दिला पाहिजे ते काम जिजाऊ ज्ञान मंदिर प. भटने केले आहे. विद्यार्थ्यांनीही सैन्यामध्ये जाऊन भारत मातेचे रक्षण केलं पाहिजे. पुस्तकी शिक्षणावरच भर न देता शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त उपक्रमावर भर दिला पाहिजे, असे श्रिकृष्ण बंगाळे यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले. तर ठाणेदार राजपूत साहेब म्हणाले की, शेतात किसान राबतो तर देशाच्या सिमेवर जवान आपल्यासाठी जागत असतो. तर यापासून आपण प्रेरणा घेत त्याचा यथोचित सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. तसेच या संकुलात नियमित वेगवेगळे अनोखे उपक्रम राबवले जातात याबद्दल कौतुकही केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांशी संवाद साधत, ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रतीचे इंग्रजी शिक्षण या संस्थेद्वारे देत आहोत. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींची, शेतकऱ्यांची मुले आपल्या शाळेत शिकतात तर त्यांना शाळेतून उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे. आणि यासोबत देशाप्रती आदर व्यक्त व्हावा, यासाठी सैनिकांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा सैनिक रक्षाबंधनाचा एक छोटासा प्रयत्न आपला आहे. हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम म्हणजे सैनिकांना भाऊ मानून आमचे विद्यार्थी त्यांच्या ऋणातून तसेच त्यांच्याकडून काहीतरी शिकता यावं यासाठी हा मौलिक संगम आज घडून आला याबद्दल आणि आपण आमच्या विनंतीला मान देऊन इतर उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो.

      *मैं दिन हुं, मैं रात हुं, मैं ऑधी मे, तुफान मे, होली मे, रमजान मे, देश के सन्मान मे, अढिग कर्तव्य की, अविचल परिपाठी हुं, मैं खाकी हुं, मैं खाकी हुं.* असा खाकी व खादी चा गौरव आज शाळेत साजरा केला.   

कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांनी केले, सुत्रसंचालन प्रियंका सरकटे यांनी तर आभार प्रदर्शन रुपाली पाटोळे यांनी केले.