Ticker

6/recent/ticker-posts

कृषी कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या आय सी ए आर - सी आय सी आर नागपूर शास्त्रज्ञ टीमची रवींद्र गायकवाड यांच्या सेंद्रिय शेतीला भेट


संजय भरदुक प्रतिनिधी मंपीर                                      

    ग्राम गाववळ येथील शेतीनिष्ठ शेतकरी रवींद्र गायकवाड यांच्या सेंद्रिय शेतीला नागपूर येथील कृषी कल्याण मंत्रालय च्या शास्त्रज्ञ टीमने आज भेट दिली यामध्ये डॉ. राकेश कुमार सायंटिस्ट बायोटेक डॉ. सोरोमन एम. कॉटन प्रोजेक्ट तसेच कृषी विज्ञान केंद्र करडा चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र काळे व त्यांची टीम सहा कीटक शास्त्रज्ञ डॉ.राजेश डवरे पीक शास्त्र विभाग प्रमुख डॉ.तुषार देशमुख, गृहविज्ञान प्रमुख डॉ.शुभांगी वाटाणे व कॉटन प्रोजेक्टचे गिरी साहेब , आदी शास्त्रज्ञ टीमने रवींद्र गायकवाड यांच्या शेतामधील एकात्मिक शेती व्यवस्थापन उपक्रम सह देशी गो पालन करून बायोगॅस निर्मिती ,गांडूळ खत निर्मिती, तसेच विहीर पुनर्भरण प्रकल्प, बायोडायनामिक कंपोस्ट निर्मिती, तसेच मातृ कल्चर पासून एस नाईन कल्चर ची निर्मिती व शेतामध्ये वापर सेंद्रिय शेती करत असताना नॅचरल कंपाउंड चे महत्व चर व्यवस्थापन ,सेंद्रिय फळबाग सहा फळ रोपवाटिका व्यवस्थापन तसेच सेंद्रिय पीक व्यवस्थापना विषयी रवींद्र गायकवाड यांच्याकडून माहिती घेतली व शेत बांधावरील प्रयोग शाळेमध्ये निर्मित ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर व निर्मिती पद्धती तसेच मायक्रोरायझरचा फीड वरती होत असलेला फायदा जाणून घेतला याकरिता शास्त्रज्ञ टीमने रवींद्र गायकवाड यांचे कौतुक केले तसेच वीहर पुनर्भरण हा प्रकल्प शास्त्रज्ञ टीमने राज्यांमध्ये प्रथमच रवींद्र गायकवाड यांच्या शेतामध्ये लाईव्ह पाहाला असल्याबाबत त्यांनी उद्गार काढले