बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
"तेजज्ञान फाउंडेशन/हॅपी थॉट्स, सातारा" यांच्या वतीने "सिल्व्हर जुबली ध्यान महोत्सवांतर्गत" सातारा जिल्हा कारागृह येथील बंद्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होण्यासाठी व ध्यानाचे जीवनातील महत्त्व समजण्यासाठी शनिवारी सकाळी 9.00 ते 10.30 या वेळेत ध्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर ध्यान धरणेच्या कार्यक्रम श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पुणे यांच्या मार्गदर्शनाने, प्रेरणेने व संमतीने घेण्यात आला.
हॅपी थॉट्सचे संस्थापक सरश्री यांच्या मार्गदर्शनाची चित्रफित स्क्रिनवर प्रसारित करण्यात आली. यावेळी एकूण 66 बंद्यांनी ध्यानाचा लाभ घेऊन नियमित ध्यान करण्याचा संकल्प केला.
हॅपी थॉट्स, सातारा यांच्या वतीने श्री. संजय नडे व विजय रोकडे यांनी उपस्थित राहून सेवा दिली. तसेच या कार्यक्रमास कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरूंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, राजेंद्र भापकर, सुभेदार महेंद्र सोनवणे, मानसिंग बागल, हवालदार पारधी, अहमद संदे, संजय येळे, नामदेव खोत, दिलीप बोडरे, शिपाई सागर मासाळ, सतीश अब्दागिरे, गीता दाभाडे, जयश्री पवार, मिनाक्षी जाधव, रूपाली नलवडे, रेश्मा गायकवाड , प्रतीक्षा मोरे, अश्विनी पुजारी, काजल सायमोते, सुदीप दळवी, तुकाराम घुटुकडे, संजय यादव व इतर कर्मचारी हजर होते.





Social Plugin