\
( या धार्मिक चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर झळकणार अनेक दिग्गज कलाकार )
शेवगाव --- जयप्रकाश बागडे
तनुश्री मुव्हीज फिल्म प्रोडक्शन, प्रस्तुत नवीन मराठी चित्रपट “ संताजी ” धार्मिक चित्रपटाचे चित्रीकरण पुणतांबा व शिर्डी येथे सुरु असुन या चित्रपटांमध्ये संत तुकारामाचे शिष्य महान संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांचे जिवनचरीत्र दाखवले जाणार आहे. या चित्रपटाचे निर्माते सौ. रजनी चौधरी व श्री. सुरेश चौधरी हे असून या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक शिर्डी येथील राज भालेराव आहेत ,
महाराष्ट्र हि संताची भूमी म्हणून ओळखली जाते. आज वर आपण अनेक संताची नावे ऐकलेले आहे , पण त्या संता विषयी संपूर्ण माहिती व इतिहास आजच्या पिढीला माहीत नसतो , असाच एक इतिहास या संताजी महाराजांच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना पहावयास चमळणार आहे. या फिल्म मध्ये संत तुकाराम महाराजांचा काळ दाखवला आहे , त्या काळात मुगलांकडून प्रजेवर व संतावर खूप अत्याचार होत असे. अशातच महाराष्ट्रातील काही फितूर झालेली लोक हाताशी घेवून संत तुकारामांच्या गाथा इंद्रायणी नदी मध्ये विसर्जन करण्यात आल्या होत्या , त्या गाथा संताजींनी परत कश्या आणल्या हे दाखवण्यात आले आहे , संताजीच्या असलेले योगदान त्यांना झालेला त्रास तुमच्या जन्मापासून तर समाधीत विविध होतानाचा संपूर्ण प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आलेला आहे तसेच त्या काळात त्यांना लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास सुध्दा दाखवण्यात आला ,
एकंदरीत माहीत नसलेला संताजी महाराजांचा इतिहास जनतेला पहावयास मिळणार आहे ,या फिल्म मध्ये तीन सुमुधुर गाणे आहेत , संत तुकारामाची भूमिका शिवसेनेतील प्रसिद्ध अभिनेते सुधीर शेवाळे करत असून संताजीची भूमिका सेवेतील प्रसिद्ध अभिनेता प्रसन्न जोशी हे करत आहेत ,
तसेच पत्रकार जयप्रकाश बागडे , दिगंबर भिसे , शांतलिंग मानूरकर , सुप्रिया थोरात ,निशा चव्हाण , अस्मिता जोशी , गौरी गायकवाड , नंदकुमार पाटील , कुमारी फरान हकीम , कुमारी तनुष्का टूटके , संजय जोगदंड, सुरेश दाभाडे, ज्ञानेश्वर दिवटे , अक्षय बडे, अजय आरणे, संतोषकुमार चोरडीया, रामदास निकम, अशोक बनकर , मोनिका चौधरी , दिनेश माने, तानाजी दुग्धे, राजू आत्तार, संजय हुडे, भागीरथ कापरे , प्रवीण जोगदंड , बापूसाहेब थोरात, विनोद थोरात, सलीम सौदागर, गोरक्षनाथ चव्हाण , सुहास वैद्य , प्रा.प्रसाद बनसोडे, राजेश मंचरे , आकाश जोगदंड, मयूर शिंदे , डॉ. अजय वारुळे, आदींच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत ,या चित्रपटाचे चित्रीकरण डी.ओ.पी. संजय गायकवाड हे करत असून रंगभूषा व वेशभूषा माधवी वानखेडे यांनी सांभाळलेली आहे. प्रोडक्शन मध्ये आकाश,अजय आरणे, मोनु , चंदन ,असून, ट्रॅव्हलिंगची जबाबदारी आकाश वाघमारे हे सांभाळत आहे. जेवण व्यवस्था सौ. पुष्पाताई विश्वासराव यांच्याकडे होती. या फिल्मच्या संकलनाची जबाबदारी कृणाल मेढे यांच्याकडे आहे ,या चित्रपटाचे चित्रीकरण शिर्डी , पुणतांबा, मुंबई, नाशिक , पुणे, मनमाड. यादी ठीकाणी होत आहे. पुणतांबा येथील स्थानिक कलावंत तसेच ग्रामस्थ यांचे खूप सहकार्य लाभले , विशेषतः स्थानिक चे जुने वाडे असलेले मालकांनी खूप मदत केली , तसेच पुणतांबा येथील समस्त भजनी मंडळ, वारकरी आणी टाळकरी यांनीही सहकार्य केले आहे लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होऊन प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची ग्वाही चित्रपटाचे निर्माते सुरेश चौधरी यांनी दिली आहे ,





Social Plugin