उमरगा- प्रतिनिधी
तालुक्यातील जकेकुरवाडी गावातील मोलमजुरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा मुलगा लागला अग्निशामक दलात.जकेकुरवाडी गावातली राम जाधव व त्यांची पत्नी मोलमजुरी करून कुटुंबांचे उदर निर्वाह करतात त्यांचा मोठा मुलगा विष्णू जाधव गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धपरीक्षेची तयारी करत होता, त्याचंच फलित म्हणूंन विष्णू जाधव याची सोलापूर महानरपालिका सोलापूर अग्निशमन विभागात ज्युनियर यांत्रिकी म्हणून निवड झाली आहे त्या बद्दल ग्रा.प.कार्यालय जकेकुरवाडी व ग्रामस्थ यांनी मिळून विष्णू व त्यांचा आई वडिलांचा सत्कार केला ,विष्णू च्या यशा मागे त्यांच्या आई वडिलांचे कष्ट आहेत च पण विष्णू ची परिस्थिती बिकट असल्या मुळे आपल्या उमरगा तालुक्यातील ज्ञानज्योती सामाजिक संस्था , अभ्यासिका मध्ये मोफत पुस्तके व मोफत अभ्यासिका उपलब्ध झाली याचा छोटा सहभाग आहे.
आई वडिलांचे कष्ट, विष्णू ची जिद्द व चिकाटी गावकऱ्यांनी साथ आणि सामाजिक संस्थेचे योगदान यांच्या संयोगातून नक्की च यश संपादन करता येत हे यातून स्पष्ट होते.





Social Plugin