Ticker

6/recent/ticker-posts

नवनियुक्त सर्व केंद्रप्रमुख यांचा सत्कार सोहळा



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 खटाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या (शिवाजीराव पाटील अण्णा गट) वतीने नूतन गटशिक्षणाधिकारी सौ सोनाली विभुते मॅडम व नवनियुक्त विस्तार अधिकारी श्री सुतार साहेब व श्री जाधव साहेब आणि  सौ गायकवाड मॅडम तसेच तालुक्यातील हजर झालेले नवनियुक्त सर्व केंद्रप्रमुख यांचा सत्कार सोहळा  पंचायत समिती खटाव वडूजमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

खटाव तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री प्रमोद खाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींना विश्वासात घेऊन सर्व शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवून आपले शैक्षणिक काम करावे असे मत व्यक्त केले. प्रशासन आणि शिक्षक बांधव हातात हात घालून तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचावतील असा विश्वास व्यक्त केला . 

सदर कार्यक्रमात सौ सोनाली विभुते गटशिक्षणाधिकारी, सौ संगीता गायकवाड मॅडम श्री चंद्रकांत सुतार, श्री दिलीप जाधव, श्री संजय     दिडके अशा सर्व अधिकाऱ्यांनी संघटनेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या वेळी खटाव तालुका शिक्षक संघातील मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली त्यामध्ये शिक्षक संघाचे सरचिटणीस श्री कृष्णात फडतरे, शिक्षक संघाचे खजिनदार व शिक्षक भवनांचे सचिव श्री आनंदा खाडे सातारा जिल्हा क्रीडा समन्वयक श्री नवनाथ खरमाटे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष श्री आकाराम खरमाटे या सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संघाचे नेते श्री शंकर देशमाने यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्री सचिन शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष श्री नवनाथ कणसे, कोषाध्यक्ष श्री चंद्रकांत निकम,नेते श्री संजय सुतार, नेते श्री अर्जुन जाधव, श्री अनिल साळुंखे, शरद शेटे, राजेंद्र खरमाटे, दत्तात्रय गोरे,  धनाजी नलवडे, अविनाश बागल, शशिकांत साबळे अतुल लोखंडे,दत्तात्रय सुतार, ज्ञानेश्वर धायगुडे, दिलीप शितोळे, देविदास ढोले,सागर सुतार,किरण खरात, तानाजी खाडे, शरद माळवे, नवनाथ साबळे, सुहास खाडे, बबन खाडे, जीवन सावंत, शशिकांत साबळे, अनिकेत चौधरी, मामीलवाड सर, श्री सत्यवान खरमाटे, श्री संतोष ओम्बासे, अशा सर्व शिक्षक संघाच्या शिलेदारांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा आणि चर्चासत्र मोठ्या उत्साहामध्ये पार पडले.