प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर
मलकापुर घिर्णी :- विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान अंतर्गत जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा घिर्णी येथे जिल्हा परिषद बुलढाणा चे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक श्री अनिल देवकर साहेब सहाय्यक कार्यक्रमा अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा चे श्री मंगेश भोरसे तसेच गट समन्वयक व शिक्षण विस्तार अधिकारी श्री रमेश वाघमारे साहेब साधन व्यक्ती श्री ईश्वर वाघ यांनी शाळेला अचानक भेट दिली असता व गुणवत्ता तपासणी केली असता सर्व बाबींबाबत खूप समाधान व्यक्त केले घिर्णी शाळेत तालुक्या जवळची शाळा असून सुद्धा वाढलेली पटसंख्या व यावर्षी कान्वेंट, हायस्कूल मधून आलेले मुला मुलींची संख्या व शाळा राबवत असलेले अनेक उपक्रम व एन एम एम एस, स्कॉलरशिप, अशा अनेक उपक्रमांची साहेबांनी स्तुती केली व 365 दिवस चालत असणारी शाळा व यश त्याबद्दल गटशिक्षणाधिकारी आदरणीय फाळके साहेब शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय वाघमारे साहेब सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्षा सर्व सदस्य व मुख्याध्यापक व शिक्षकांचे कार्य याबद्दल आनंद व्यक्त केला शाळेला असेच यश मिळतं राहील यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या





Social Plugin