बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांती दिन हा महत्त्वपूर्ण दिवस आहे असे प्रतिपादन प्रा. अमृत साळुंखे यांनी केले. पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात इतिहास विभाग आयोजित क्रांतीदिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. पी. भोसले, प्रा.डॉ. संजय क्षीरसागर, प्रा.खाडे ए.टी,प्रा.डॉ ए. एस.जगताप ,प्रा.के.जी. कुंभार इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे ते आपल्या भाषणात म्हणाले,' महात्मा गांधी यांच्या 'भारत छोडो' आंदोलनामुळे भारतीय जनता इंग्रजांच्या विरोधात उभी राहिली त्यामुळे ब्रिटिश सत्तेने आंदोलन चिरडण्यासाठी महात्मा गांधीं.पंडीत नेहरू यांना अटक केली. या आंदोलनामुळे भारतीय जनता एकत्र आल्यामुळे क्रांती दिनाला महत्त्व प्राप्त झाले. .
हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्याचे, बलिदानाची आठवण करून देतो .दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्तेने भारतीयांना युद्धात सहभाग घेण्यास भाग पाडले .त्यामुळे भारतीय जनतेमध्ये असंतोष वाढत गेला. महात्मा गांधींनी 'करेंगे या मरेंगे' मंत्र दिला. आणि आंदोलनाची सुरुवात झाली. भारतीय छोडो आंदोलन हे भारतीय स्वतंत्र चळवळीतील महत्त्वाचे आंदोलन होय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास प्रमुख डॉ. अनिल जगताप यांनी क्रांती दिनाची पार्श्वभूमी सांगितले अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. पी भोसले म्हणाले,' क्रांतीदिन' हा स्वातंत्र्यानंतरही महत्त्वाचा आहे.
या दिवशी आपणास स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण होत असते. तसेच या दिवशी आपणास आपल्या इतिहासाची जाणीव होते . याविषयीचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश आवळे यांनी केले. तर आभार प्रा के.जी.कुंभार यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक ,विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin