बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
निकिता पाचांगणे हिने आपल्या पालकाच्या आशीर्वादाने व पाठिंब्याने एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊन पीएसआय पदाला गवसणी घातली . या पालकांचा आदर्श वर्धनगड पंचक्रोशीतील पालकांनी घेऊन आपले पाल्य मुले उच्चपदस्थ पदावर जाण्यासाठी प्रत्येक पालकाने विचार करण्याची गरज असल्याचे मत पुसेगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नि. आशिष कांबळे यांनी व्यक्त केले.
वर्धनगड तालुका खटाव येथे येथील निकिता पाचांगणे हिने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन पीएसआय पदी नियुक्ती झाल्यानंतर वर्धनगड मुस्लिम समाजाच्या वतीने तिचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यावेळी सपोनी आशिष कांबळे बोलत होते. यावेळी निकिता पचांगणे, सरपंच अर्जुन मोहिते, जालिंदर पाचांगणे, राजेंद्र वरेकर, पोपटराव चव्हाण, अण्णा पाचंगणे,अर्जुन कुंभार, शंकर अनपट उपस्थित होते. स्वप्नी आशिष कांबळे पुढे म्हणाले " निकिताने उच्च पदवीधर परीक्षा चांगल्या मार्काने पास होण्यासाठी घेतलेले कष्ट श्रम यशस्वी झाले असून,नवीन पिढीला तिचे हे यश प्रेरणा देणार असून वर्धनगड पंचक्रोशीचा अभिमान आहे. प्रत्येक पालकाने याचा विचार करण्याची गरज असून, आपला पाल्य उच्चपदास्त पदावर जाण्यासाठी आपल्या पाल्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व खंबीर साथ दिली पाहिजे. व पाल्यांनीही प्रेरणा घेऊन आपणासाठी आपल्या घरासाठी आपल्या गावासाठी आपण काहीतरी केले पाहिजे अशी जिद्द मनात असली पाहिजे,निकिताला मिळालेल्या पदाचा मान सन्मान राखून आपल्या गावचे नाव उज्वल करशील अशी शुभेच्छा व्यक्त करून कुठलीही मदत लागल्यास पुसेगाव पोलीस स्टेशन सर्वतोपरी सहकार्य करील अशी ग्वाही दिली. निकिता पाचांगणे यावेळी बोलताना म्हणाली " आपल्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट अवघड नाही, परंतु ती आपण जिद्दीने अवगत करण्याची हिंमत ठेवली पाहिजे, मी अनेक परीक्षा दिल्या त्यामध्ये उत्तीर्ण झाले,
आज एमपीएससीच्या माध्यमातून पीएसआय पदी विराजमान झाले ते माझे आई-वडील यांच्या विशेष मार्गदर्शनाने तसेच त्यांची वारंवार असणारी खंबीर साथ ही मला मोलाची ठरली आहे. माझे यश संपादन झाल्यानंतर गावाने केलेले स्वागत निश्चितच मला प्रेरणादायी असून माझ्या लोकांच्या आशीर्वादाने मी निश्चितच पुढील कार्यात यशस्वी होईल असे मत निकिता पाचांगणे यांनी व्यक्त केले. सरपंच अर्जुन मोहिते यांनीही आपले विचार व्यक्त केले यावेळी प्रास्ताविक हुसेन शिकलगार यांनी केले तर आभार प्रदर्शन निसार शिकलगार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, रियाज शिकलगार, हाजी गफूर शिकलगार, रशीद भालदार, हशम शिकलगार, शागीर शिकलगार आदींनी विशेष परिश्रम घेतले,या कार्यक्रमासाठी, शमशुद्दीन शेख भिकनभाई मुलांनी, बशीर मुलांनी, अकबर भालदार, अभिजीत पाचांगणे, पोलीस पाटील गणेश जठार,विकास जाधव, गोपनीय विभागाचे अमोल जगदाळे, शंकर पचांगणे, तसेच मुस्लिम समाजाचे सर्व तरुण वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता.





Social Plugin