Ticker

6/recent/ticker-posts

शेवगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे नुकसान -भरपाई मागणी



प्रतिनिधी. शौकत शेख 

शेवगाव-तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे या तालुक्याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई की देण्यात यावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी शेवगाव चे तहसीलदार प्रशांत सागडे यांच्याकडे केली खासदार निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी शनिवारी तालुक्यातील परिसरात जाऊन आढावा घेतला व झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी सर्व रस्ते चिखलमय झालेले व शेतात दोन-तीन फूट पाणी सासल्याचे निदर्शनात आले तसेच तुर. मूग. सोयाबीन .कापूस .ऊस इतर पिकाचे नुकसान झाले आहे तरी त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी या ठिकाणी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई की मिळाली अशी भावना खासदार निलेश लंके व प्रतापराव ढाकणे यांच्यासमोर व्यक्त केली