Ticker

6/recent/ticker-posts

झरे महाविद्यालयाच्या प्रा. सौ. माया माने सेट परीक्षेत यश


महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय, झरे मधील तत्वज्ञान विषयाच्या  प्रा. सौ. माया सचिन माने यांनी सेट परीक्षेत यश मिळवले. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले.

 यासाठी त्यांना त्याचे पती सचिन माने याची साथ मिळाली. या यशासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य  आर. एच. पाटील  तसेच संस्थेचे चेअरमन आर.एस.चोपडे, सचिव एस.ए.पाटील, व्हा. चेअरमन एल. टी. शेंडगे, खजिनदार एस. व्ही. अनुसे सर्व संचालक मंडळ आणि ज्येष्ठ सल्लागार यांचे मार्गदर्शन मिळाले तसेच सहकारी प्राध्यापक- प्राध्यापिका यांचे विशेष सहकार्य लाभले. या यशाबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.