Ticker

6/recent/ticker-posts

कृषीदुतांकडून 'FMD' रोगप्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फलटण येथील कृषी महाविद्यालयातील कृषितांनी FMD या रोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर आयोजित केले होते. या वेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जनावरांना लसीकरण करण्यात आले. 

यावेळी आजारावरील प्रतिबंधात्मक उपायासाठी कृषीदुतांनी खालील माहीती दिली .ज्या जनावरांना ह्या आजाराची लागण झाली असेल अशा जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. आजारी जनावरांची हालचाल एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी करू नये. आजारी जनावरांना त्यांची वासरे पाजू नये. ज्या जनावरांना आजाराची लागण झालेली आहे. त्यांना बाहेर चरायला नेऊ नये, इत्यादी माहीती शेतकर्यांना देण्यात आली

यासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, सुमित बागुल, ओंकार खेडकर, गौरव रायकर, अमितेश बोदडे, आदित्य घेवारे यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.