Ticker

6/recent/ticker-posts

सिंदखेड राजा तहसीलदार यांची धडक कारवाई अवैध मुरूम खोदकाम,व वाहतूक करणारे 11 ट्रॅक्टर व 1 जेसीबी जप्त



*सिंदखेडराजा/ ज्ञानेश्वर तिकटे*

सिंदखेडराजा:-  सिदखेडराजा येथे काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारलेले नवनियुक्त तहसीलदार श्री अजित दिवटे यांनी दुसरबीड येथे धडक कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक.24.09.2024 रोजी दुसरबीड येथे अवैध मुरूम उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी लगेच आपले सहकारी घेऊन त्यांनी त्या ठिकाणी कारवाई केली. या कारवाईमध्ये त्यांनी 11 ट्रॅक्टर व 1 जेसीबी ही जप्त केली. या वाहनावर पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन किनगाव राजा येथे सुपूर्त करण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेडराजा तहसीलदार श्री अजित दिवटे, तलाठी गजानन टेकाळे, राहुल देशमुख, तलाठी राठोड, महसूल सहायक श्री जिने व कोतवाल यांनी ही कारवाई केली.

सदर ठिकाणी जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर त्यांनी फक्त ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला लावलेले आहेत बाकी दंडात्मक कारवाई त्यांच्याकडूनच कळू शकेल-ठाणेदार विनोद नरवाडे