Ticker

6/recent/ticker-posts

मत्स्योदरी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या चार विद्यार्थ्यानी अग्निविर परीक्षेत मिळविले घवघवीत यश


 अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

अंबड येथील मत्स्योदरी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले जातात. मस्त्योदरी केंद्राचे शिस्तप्रिय,गुणवान संचालक ज्यांनी आपल्या केंद्राच्या माध्यमातून खेड्यातील गोरगरीब विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याची जिद्द निर्माण केली असे संचालक गणेश भैय्या गिरी सर,गोकुळ सर,यांच्या उत्कृष्ठ रित्या मार्गदर्शनाखाली शरद सरगर,अक्षय मुऱ्हाडे,सुदर्शन गायके,पवन राऊत या विद्यार्थ्यानी अग्नीविर या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असुन त्यांची निवड झाली 

असून त्यांचा जंगी वाजत गाजत सत्कार संचालक गणेश भैय्या गिरी,गोकुळ सर ,राजमुद्रा अभ्यासिका केंद्राचे संचालक गणेश मुळे सर,अंबड पोलीस स्टेशनचे कर्तबगार अधिकारी रामेश्वर मुळक,कपिल भाऊ राऊत,साठे कोचिंग क्लासेस चे संचालक महेश साठे,वैभव गायकवाड, निवृत्ती सर ,दिपक लोहकरे,भरत राठोड,रोहित जाधव,माऊली मुळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार  करण्यात आला असून त्यांना पुढील देश कार्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या असुन यावेळी विद्यार्थी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते...